सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : तालुक्यात नैसर्गिक आपत्तीची झळ भुरकी, शेलु, रांगणा या गावाला बसली,या गावातील असंख्य नागरिकांना प्रशासनाने स्थलांतरित केले तर या अतिवृष्टी मध्ये काही जनावरांचा मृत्यू देखील झाला तर 45 जनावरांना हलविण्यात आले होते.
सध्या पूरपरीस्थिती नियंत्रणात असून बाधितांना मदतीची नितांत गरज लक्षात घेता, येथील शिव मंदिर चिखलगाव व ग्रामवासी चिखलगाव यांचे कडून भुरकी, शेलु, रांगना या गावात अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
आवाहन जनतेसाठी :
ज्या गावात पूर परिस्थिती उद्भवली नाही अशा गावातील सरपंचांनी व नागरिकांनी मदत करावी असे आवाहन शिवमंदिर देवस्थान कमिटी चिखलगाव यांच्या तर्फे करण्यात आले.