योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : मौजा गाडेघाट येथील 37 वर्षीय युवकाची विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी झरी तालुक्यात घडली.
विनोद नामदेव नागपुरे असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. विष प्राशन केल्याची माहिती मिळताच त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनोद याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील व भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
पुढील तपास पोलीस करित आहे.