टॉप बातम्या

माजी सभापती अभय सोमलकर यांचे अल्पशा आजाराने निधन

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : पंचायत समितीचे माजी सभापती अभय सोमलकर (48) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते मागील काळापासून आजारी होते. त्यांचेवर नागपूर येथे उपचार सुरु असतांना शुक्रवारी ( 24 जून) ला मध्यरात्री त्यांचे निधन झाले. ते  जेष्ठ शिवसैनिक होते तसेच वणी पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले आहे.
अभय सोमलकर मास लीडर म्हणून वणी विधानसभा क्षेत्रात परिचित होते. शिवसेनेचे सभापती म्हणून त्यांची कारकिर्दीत जनहितार्थ अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच त्यांच्यातील संघटन कुशल वाखान्याजोगे होते. त्यामुळे शिवसेनेचे संघटन परिसरात मजबूत झाले होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेचे संघटनात्मक फार मोठी हानी झाली असून शिवसैनिकात व संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांचे पश्चात पत्नी, आई वडील, दोन मुले असा आप्त परिवार आहे. 

Previous Post Next Post