टॉप बातम्या

तालुक्यात दुबार पेरणीचे संकट, पाऊस नाही; शेतकरी आर्थिक विवंचेनेत

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : असाच पाऊस लांबला तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात पराटी टिबली. मात्रपावस रुसून बसल्याने तालुक्यात दुबार पेरणीचे संकट बळीराजा समोर उभं ठाकले असून शेतकऱ्यांना मुसळधार पावसाच्या प्रतीक्षा लागली आहे.
तालुक्यातील काही भागात पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अशातच काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली मात्र आज पाऊस येईल उद्या पाऊस येईल म्हणत पाऊस काही आला नाही. त्यामुळे उष्णतेने जमिनीतील अंकुरलेली बीज नष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले.
रोहनी नक्षत्रात काही शेतकरी दरवर्षी प्रमाणे पावसाच्या आधीच पेरणी करतात, त्यानंतरही मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावर अनेक शेतकरी आपली पेरणी पावसा पूर्वीच करून घेतली. मात्र, काही भागात हलका माध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे टिबलेली बीजे खराब होऊ लागली आहे. आता दुबार टिबावं लागेल, पुन्हा आर्थिक भ्रूदंड सोसावं लागेल या विवंचेनेत शेतकरी असून तालुक्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
Previous Post Next Post