टॉप बातम्या

वणी ते नांदेपेरा रोड जड वाहतुकीस बंद करा; अन्यथा रास्ता रोको आंदोलन


चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी ते नांदेपेरा हा रोड साधारणत: 10 टन वाहतुकीच्या क्षमतेचा आहे. त्यातही मजरा ते नांदेपेरा हा 3 कि.मी. रस्त्याची रुंदी फक्त 12 फुट असुन आज रोजी 8 ते 10 फुट रुंदीचा रस्ता अस्तीत्वात आहे. 
वणी ते मजरा मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी रोडची क्षमता 10 टन वाहतुकीची असल्याने या रोडची मागील 6 ते 8 महीन्यापासुन जड वाहतुक सुरु असुन ती 20 ते 50 टनापयॆंत क्षमतेची असुन 16 ते 20 चाकी मोठे ट्रकनी कोळशाची व रेतीची वाहतुक सुरु आहे. त्यामुळे वणी ते नांदेपेरा या रोडवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असुन रोड पूर्णतः उखडला आहे.
बरेच अपघात व जिवहानी झालेली आहे. करीता येत्या 8 दिवसात हा रस्ता जड वाहतुकीस बंद करण्यात यावा. अन्यथा नांदेपेरावासी व आजुबाजुचे गावातील नागरिक "रास्ता रोको आंदोलन" करतील. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी (SDO) वणी यांना देण्यात आले.
निवेदन देतांना काॅ.अनिल घाटे, शंकर केमेकार, राकेश खामनकर, एकनाथ रायसिडाम, सारंग घाटे, भारत केमेकार, अथर्व निवडिंग, राजु चिडे, संदीप तीखट, गणेश लांडगे, प्रविण चिकटे, प्रदिप केमेकार, अविनाश केमेकार, संजय चहानकर यांचेसह शेकडो नागरिक उपस्थीत होते
        जाहिरातसाठी संपर्क करा : 9011152179

Previous Post Next Post