चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
येथील माजी पंस चे सदस्य मा. अशोकभाऊ वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या राबसच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आला.
८ जून ला झालेले रिंग रोड रास्ता रोको आंदोलन, रेल्वे विभागाने मागितलेली ७ दिवसाची मुदत, ग्रामसभेत घेतलेले निर्णय, वणीत झालेली सर्वपक्षीय बैठक, जिल्ह्याधिकारी यांचे सोबत झालेली चर्चा आणि त्यांचेकडून होणार असलेले सर्वेक्षण व या विविध संघर्षमय मार्गामुळे होत असलेले परिणाम ह्यावर गंभीर मंथन करून पुढील आंदोलनाच्या रोडमॅप तयार करण्यात आला. राजूर येथील रेल्वे कोळसा सायडिंगला नियमानुसार राजूर ग्रामसभेची परवानगी व प्रदूषण नियंत्रण बोर्डाने निर्धारित केलेले नियम ह्या दोन्ही बाबींची पूर्तता नसल्याने ही कोळसा सायडिंग पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्वरित बंद करण्याचे आदेश संबंधित अधिकारी व विभागाने देणे अत्यावश्यक असतानाही ह्याकडे कानाडोळा केल्या जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवरही कर्तव्यात कसूर करीत असल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, तसेच अनधिकृत कोल डेपो उभारणाऱ्या मालकांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्याचे ह्या बैठकीत ठरविले आहे.
कोर्टात पिटीशन दाखल करणे, गावबंद आंदोलन, धरणे आंदोलन, मुंडन आंदोलन, बेमुदत रास्ता रोको आंदोलन, घेराव आंदोलन असे विविध संघर्षमय मार्ग हाताळण्याचे सुद्धा ठरविण्यात आले आहे. या बैठकीत अनेकांनी ठेवलेल्या प्रश्नांवर गंभीरतेने तोडगा काढत पुढील आंदोलनाची दिशा निर्धारित करण्यात आली. या बाबतची सूचना संबंधित विभागाला देऊन आंदोलनाला सुरू करण्यात येत असल्याचे राजूर बचाव संघर्ष समितीने म्हटले आहे.
या बैठकीला जिप सदस्य संघदीप भगत, मो. अस्लम, कुमार मोहरमपुरी, साजिद खान, प्रवीण खानझोडे, अनिल डवरे, प्रकाश तालावर, ऍड. अरविंद सिडाम, ऍड. जितकुमार चालखुरे, रियाजुल हसन, राहुल कुंभारे, जयंत कोयरे, कन्हैय्या कलपूलवार, रोहित केवट, नीरज कश्यप, रफिक सिद्दीकी, मो. खुसनुर, श्रावण पाटील, अमृत फुलझेले, अश्फाक अली, तथागत मस्के, लेखराम साहू, सरफराज अहमद, रतन राजगडकर, नारायण दुधे, रामलाल वर्मा, मारोती कोंडगुर्ले, इम्रान शेख, सागर नगराळे, चरणदास करमणकर, जाबिर, नौशाद अहमद, सुरेश पेंटापर्टीवार, कैलास यादव, संजय भोंगाडे, रामनंदन यादव, नथुजी भगत, नंदकिशोर कवाडे, मो. शफीक आदी उपस्थित होते.