टॉप बातम्या

बानायत येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन.

चेतन पवार | सह्याद्री चौफेर

दारव्हा : तालुक्यातील बानायत येथे हा तालुका प्रशासन आपल्या दारी तहसिल कार्यालय,दारव्हा यांच्या वतीने महाराजस्व अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ. वंदना प्रविण जमनाके तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. सुभाष जाधव साहेब तहसिलदार दारव्हा हे उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये सरपंच, उपसरपंच प्रदिप गुल्हाने, ग्रामपंचायत सदस्य, अतिथी व तंटामुक्ती अध्यक्ष गावातील नागरिक उपस्थित होते. मा तहसिलदार श्री. सुभाष जाधव साहेब यांच्या हस्ते पारधी समाजातील ६४ व्यक्तींना जात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे राशनकार्डचे देखील वाटप करण्यात आले.
या पारधी समाजातील लोकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तालुका प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन तहसिलदार श्री सुभाष जाधव यांनी उपस्थित लोकांना दिले व त्यांच्या दृष्टीने जात प्रमाणपत्र, राशनकार्ड, इत्यादीचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाला ग्रा.पं. साहेब, मंडळ अधिकारी लाडखेड श्री मनोज राउत साहेब देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केले तर आभार श्री मनोज रात मंडळ अधिकारी लाडखेड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेवढी मंडळ अधिकारी, तलाठी, सचिव, कोतवाल, कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी,यांनी कष्ट घेतले.
Previous Post Next Post