दुचाकीस्वार धडकला दिशादर्शक फलकाला

विवेक तोडासे / सह्याद्री चौफेर 

मारेगाव :
यवतमाळहुन मारेगाव वणी कडे जात असतांना मांगरूळ नजीक असलेल्या दिशादर्शक फलकावर दुचाकी स्वार धडकल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मोटारसायकल क्रमांक MH29, AH 9275 या शाईन कंपनी च्या दुचाकीने जोरदार धडक दिली, यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून, आज रोजी सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान घडली.

जखमी सय्यद इप्तेकार सय्यद अकील (२७) रा. यवतमाळ हे यवतमाळ मारेगाव वणीकडे जात असतांना मांगरूळ रोड वेगाव फाटा जवळ दिशादर्शक फलकावर जोरदार धडक दिल्याने यात ते गंभीर जखमी झाले तर येथील दिशादर्शक फलकही कमालीचा झुकला आहे.

त्यामुळे जखमेतून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता त्याचे वर प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथे हलवण्याची तयारी सुरू होती.