टॉप बातम्या

यवतमाळात अमोल मिटकरी विरोधात ब्राम्हण संघ आक्रमक

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : इस्लामपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. ब्राह्मण समाजाविषयी तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य करुन ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मण पुरोहित सेवा संस्थेने केली आहे. शनिवार शहर पोलिस ठाण्यात तशी तक्रार देण्यात आली असून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
 
आमदार अमोल मिटकरी यांनी अपमानास्पद उल्लेख केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी ब्राह्मणांच्या केलेल्या नकलेवर हसून दाद देत या भावनांना प्रोत्साहन दिले. धार्मिक भावना तसेच जनसामान्यात ब्राह्मण वर्गाबाबत गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण करून खिल्ली उडविली. पौराहित्य करणार्‍या ब्राह्मण समाजाचा सार्वजनिक बदनामी केली. हे गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य केल्याबद्दल आमदार मिटकरी वर कारवाईची मागणी ब्राम्हण, पुरोहीत संस्थेने केली आहे. याशिवाय परंपरागत हिन्दु विवाह पद्धतीवर टीका केली आहे. सभेत राज्य शासनातील मंत्री उपस्थित हेाते. मात्र, त्यांनी यांचा निषेध केला नाही. आमदार मिटकरी यांचे वक्तव्य व्देष निर्माण करणारे आहे. त्यामुळे त्यांचेवर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याची मागणी ब्राम्हण पुरोहीत सेवा संस्थेने केली. यावेळी ब्राम्हण सेवा संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post