कुंभा येथे मद्यपीकडून एकाला मारहाण


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील कुंभा येथील एका ६० वर्षीय  इसमाला शुल्लक कारणावरून नशेच्या भरात काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. 9 डिसेंबर रोज गुरुवारला दुपारच्या चार वाजताच्या सुमारास घडली.

भाऊराव टेकाम रा. कुभा असे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. टेकाम यांना गावातीलच ४० वर्षीय इसमाकडून काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. यात डोक्याला,पायावर मारहाण केली असल्याने टेकाम यांना जखमी अवस्थेत मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, येथील प्राथमिक उपचार करून भाऊराव टेकाम याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

सध्या तरी घटनेचा मारेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे समजते.