टॉप बातम्या

सिंदीच्या युवकाने संपविली आपली जीवन यात्रा

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : सिंधी येथील २८ वर्षीय युवकाने विष  प्राशन केल्याची घटना दि.१० नोव्हेंबर ला सांयकाळी ५:३० च्या सुमारास त्याचे राहते घडली. 

अंकुश अरुण महारतळे रा. सिंदी असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथे ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल केले असता, गुरूवार दि.११ नोव्हेंबर ला अंकुश यांची चंद्रपूर येथे उपचारादरम्यान सायंकाळी ६:३० वाजता निधन झाले. त्याच्या आत्महत्या चे कारण अद्याप कळू शकले नाही.
अंकुश यांच्या पाठीमागे आई, वडील एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे.


Previous Post Next Post