टॉप बातम्या

गरीब व गरजूवंत विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अभ्यासिका उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद - आ. किशोर जोरगेवार

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : कोरोना काळात अभ्यासिका बंद होत्या. त्यांनतर अभ्यासिका सुरु झाल्यात मात्र त्याचे शुल्क सर्व सामान्य विद्यार्थ्यांना न परवडण्यासारखे होते. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही निशुल्क दरात उत्तम अभ्यास करता यावा याकरिता 11 अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प मी केला. आज यातील दुस-या अभ्यासिकेचे भुमिपूजन संपन्न झाले आहे. त्यामूळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क अभ्यासिका उभारण्याच्या स्वप्नपूर्तीकडे वेगाने वाटचाल होत असल्याचा मला अतिशय आनंद होत असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे विद्यमान अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
   
नगर सेवक पप्पू देशमूख व स्थानिक नागरिकांच्या मागणी नंतर नानाजी नगर दत्त मंदिर येथे स्थानिक आमदार विकास निधीतून 25 लक्ष रुपयांची अभ्यासिका मंजूर करण्यात आली आहे. आज रविवारी या अभ्यासिकेचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. युपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन चंद्रपूरचे नाव लौकिक करणाऱ्या अंशुमन यादव यांच्या हस्ते या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी अंशुमन यादव आणि गडचिरोलीचे उपशिक्षणाधिकारी स्नेहल अशोक काटकर यांची सत्कामूर्ती म्हणून तर मनपा सभागृह नेता देवानंद वाढई, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मनपा नगर सेवक पप्पू देशमूख, वडगावच्या नगर सेविका सुनिता लोढीया, शंकर क्रिडा व सांस्कृतीक मंडळचे अध्यक्ष विनोद निखाडे, मनोज भैसारे, धनश्याम येडगुडे, अमर यादव आदिंची प्रमूख अतिथी म्हणून मंचावर उपस्थिती होती.
  
आमदार जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर शहरातील शेवटच्या भागांचा विकास करण्याच्या दिशेने माझे प्रयत्न सुरु असून यासाठी मोठा निधी आपण उपलब्ध केला आहे. या निधीतून या भागात पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. कोरोना काळात रुग्णांच्या सेवेसाठी आपण नवीन चार रुग्णालय सुरु केले. सर्व सामान्यांना आवश्यक असणां-या सोयी सुविधा उपलब्घ करुन देणे ही आमच्या विकासाची परिभाषा असल्याचे ते यावेळी पुढे बाेलतांना म्हणाले, नगर सेविका सुनिता लोढीया यांच्या प्रभागात सार्वजनिक सभागृहासाठी 30 लक्ष रुपये देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. हे सर्व विकास कामे होत असतांना शिक्षण क्षेत्रातही भरीव काम करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. 25 लक्ष रुपयातून साकार होत असलेल्या या अभ्यासिकेतील पुस्तकांसाठी आणखी १० लक्ष रुपयांची घोषणाही यावेळी त्यांनी केली.
चंद्रपूरचा विद्यार्थी शिकला पाहिजे त्याने चंद्रपूर जिल्हाचे नाव लैकिक केले पाहिजे ही सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, यासाठी सदरहु विद्यार्थांना तसे वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्यामुळे या अभ्यासिकेत विद्यार्थांना योग्य मार्गदर्शन केल्या जावे अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post