टॉप बातम्या

घुग्गूस येथे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना डिजीटल वजन काट्यासह अन्य साहित्यांचे वाटप - अनेकांची उपस्थिती



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील आैद्याेगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणा-या घूग्घूस येथे
संत शिरोमणी सावता माळी रयत बाजारच्या वतीने विकेल ते पिकेल या माेहिमे अंतर्गत दि. २३ नोव्हेंबरला शेतकऱ्यांना डिजिटल वजन काट्यासह खुर्च्या टेबल व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शेतक-यांनी शहरात एका ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र उभारले हाेते. सदरहु विक्री केन्द्र बघण्यांसाठी बघ्यांनी गर्दी केल्याचे चित्र या वेळी प्रत्यक्षात दिसून आले. भाजीपाला जर प्रत्येक उत्पादक शेतक-यांनी स्वताहुन विक्री केंद्र आरंभ केले तर, त्यांना निश्चितच अधिकचा फायदा मिळेल असे मनाेगत कृषी सहायक जयश्री खिल्लारे यांनी या वेळी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केले.

सदरहु कार्यक्रमाचे आयोजक चंद्रपूरचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण धानाेरकर यांनी उपस्थित असलेल्या प्रत्येक उत्पादक शेतकऱ्यांना डिजिटल काटा वापरण्याचे प्रशिक्षण या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिले. आयोजित या कार्यक्रमाला चंद्रपूरचे तहसिलदार निलेश गाैंड तालुका कृषी अधिकारी सी. एस.ठाकरे मंडळ कृषी अधिकारी बी. एम गायकवाड, कृषी पर्यवेक्षक एस.दातारकर या शिवाय घूग्घूस नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जूही, कृषी सहायक जयश्री खिल्लारे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण धानाेरकर तसेच अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेतकरी वर्गांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची अनेकांनी प्रशंसा केली.तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा ब-याच कास्तकार वर्गांनी या वेळी व्यक्त केली.
Previous Post Next Post