टॉप बातम्या

अभिनेत्री कंगना राणावतवर कारवाई करा - सरपंच साईश वारजूकरांची मागणी


सह्याद्री न्यूज | विलास पिसे (नेरी)

चिमूर : सिने अभिनेत्री कंगना अमरदीप राणावत हिला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिल्यानंतर कंगना राणावत हिने सन १९४२ मध्ये देशाला स्वातंत्र्य हे भिकेमध्ये मिळाले, या देशाला खरे स्वातंत्र्य सन २०१४ नंतर मिळाले असे वक्तव्य करून देशाच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा अपमान केला आहे. त्यामुळे तिच्या वर देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा या आशयाची मागणी काल दि.१६ नाेव्हेंबरला भिसी पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक यांचे कडे एका निवेदनातुन शंकरपूरचे सरपंच साईश सतीश वाजूरकर यांनी केली.
   
या वेळी अक्षय सहारे, कविश चौधरी, जगतजी तांबे, आकाश हजारे, वैभव चौधरी हे उपस्थित होते.
Previous Post Next Post