टॉप बातम्या

तलाठी विनाेद खाेब्रागडेंने अकृषक वसूलीचा नाेटीस देताच चेक व्दारा वसूलीची रक्कम जमा

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील वराेरा उपविभागाचे सुपरिचित पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी एमएसईटीसी (MSETC) वराेरा, मुख्य कार्यालय बल्हारपूर या कंपनीला महसुल विभागाचा अकृषक सारा २४ तासाच्या आत भरा अन्यथा नियमाप्रमाणे जप्तीची कारवाई करु असा नाेटीस तामील केला हाेता. त्यांचा हा नाेटीस बघताच सदरहु कंपनीच्या अधिका-यांनी पटवारी विनाेद खाेब्रागडे यांना लगेच गुरुवार दि. १८ नाेव्हेंबरला १ लाख ४४ हजार १४४ रुपयांचा धनादेश नेण्यांसाठी बाेलाविले व ताे चेक त्यांचे कडे सुपुर्द केला.
 विशेष म्हणजे खोब्रागडे यांची शासकीय वसूली ही १०० टक्के असते. जर काेणी शासन वसूली भरली नाही तर ते नियमानुसार कारवाया देखील करतात हे तेव्हढेच खरे आहे!
Previous Post Next Post