Page

वेकोलीच्या अधिकाऱ्यांकडून हाेतेयं गावकऱ्यांची दिशा भूल, गावक-यांत संतापाची लाट!


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२ आक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम कोरपना तालुक्यातील पैनगंगा वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी विरूर गाडेगाव येथील गावक-यांची दिशाभूल केली असल्याचे एकंदरीत दिसून येते .अधिकारी यांच्या आडमुठ्या ,अरेरावी व हेकेखोर धोरणामुळे गावकरी आर्थिक संकटात अडकले आहे. दरम्यान गावकऱ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांच्या कडे पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर गाडेगावच्या विरोधात एक लेखी तक्रार सादर केली आहे.
   
पैनगंगा वेकोली प्रकल्प विरूर यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता गावात डोल्जर लावून घरे पाडून बेघर केले. ग्रामपंचायतशी संबंधित असलेल्या सरपंच व काही लोकांना खैरगाव नाल्याच्या जवळ जागा दिली आहे. याच संदर्भात गावकऱ्यांनी या प्रकल्प अधिका-यांच्या विरोधात जिल्ह्यातील पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे तक्रार करुन त्या तक्रारीची प्रत गावक-यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांंच्या कडे पाठविली आहे. या शिवाय त्या तक्रारीच्या प्रती राजुरा-याचे, आमदार सुभाष भाऊ धोटे, व जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठविण्यांत आल्या आहे. दि. 27 सप्टेंबरला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली एका सभेचे आयोजन केले होते.परंतु ही सभा अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेला वेकोलीचे अधिकारी, विरूर ग्रामस्थ व कोरपना रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतम धोटे उपस्थित हाेते. उपराेक्त सभेत काहीच तोडगा निघाला नसल्याचे गावक-यांनी या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बाेलतांना सांगितले.
तदवतचं काही गावकरी मंडळी कडुन पैनगंगा वेकोली प्रकल्प अधिकारी यांची तक्रार काेरपना तहसीलदार व गडचांदुर पाेलिस स्टेशनला करण्यांत आली आहे. गुन्हा दाखल न केल्यास न्यायालयात जाण्यांची तयारी तक्रारदार्त्यांनी बाेलून दाखविली आहे. तहसीलदार यांचे कडे तक्रार करतांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर खाडे , रिपब्लिकनचे तालुका सरचिटणीस गौतम धोटे, साहेबराव घुग्गूल, काँंग्रेसचे कार्यकर्ता उत्तमराव पेच्चे हजर हाेते.

सदरहु गावातुन अवैध कोळसा उत्खनन, सुरू केले आहे ते पैनगंगा वेकोलीच्या अधिका-यांनी थांबवावे अशी मागणी त्यांनी एका लेखी निवेदनातुन तहसिलदार काेरपना यांचे कडे केली आहे .विरुर वासियांना पुनर्वसन स्थळी प्लाँट देण्यांत यावे किंवा प्रत्येकांना प्लाँटचा याेग्य माेबदला देण्यांत यावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे.