टॉप बातम्या

मोहदा येथे ग्राम स्वच्छता मोहीम


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२५ ऑक्टो.) : मोहदा येथील ग्रामवासियांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५३ व्या पुण्यतिथी निमित्ताने गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेत महाराजांच्या "स्वच्छ करूया गांव सगळे, या जनी हॊ क्षणी" या संदशाचे आदर्श ठेवत नवयुवकांनी स्वतः हातात झाडू घेऊन गावातील रस्ते, खुल्या जागेवरील कचरा, साचलेली घाण, पसरलेले सांडपाणी व ग्राम सफाई करून स्वच्छता मोहीम यशस्वी पार पाडली.

यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, तुकडोजी भजन मंडळ मोहदा, हनुमान देवस्थान कमेटी मोहदा पर्यावरण दक्षता समिती मोहदा अमोल शेलवडे, गजानन ढवळे, बळीराम वांढरे, धीरज राजुरकर, व सर्व मोहदा ग्रामवासी सहभागी झाले होते.
Previous Post Next Post