टॉप बातम्या

पाटणबोरी येथे श्री नगाजी महाराज पुण्यतिथी साजरी

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२५ ऑक्टो.) : तालुक्यातील पाटणबोरी येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री नगाजी महाराज यांची पुण्यतिथी येथील नाभिक समाज संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी नाभिक समाजाचे जिल्हाप्रमुख संतोषभाऊ नक्षणे यांच्या हस्ते समाजाचे आराध्य दैवत श्री नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या पुण्यतिथी निमित्ताने नगाजी महाराज यांच्या विचार व जीवनपटावर संतोष नक्षणे यांनी प्रकाश टाकला.

निलेश कडुकर, सचिन करमळकर, संतोष चौधरी, विनोद कडलवार, संकेत कडूकर, पवन नक्षणे, बंटी नक्षणे, नितीन करमलकर, गजू कळलवार, गोपाल यालमपेलीवार, राजू चौधरी, सुनील भाऊ नक्षणे व इतर समाज बांधव प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते.
Previous Post Next Post