प्रोटानच्या चंद्रपुर जिल्हा अधिवेशनात अनेकांची उपस्थिती - मीनाक्षी राऊत व धनराज दुर्येधन सन्मानित

 
सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१२ ऑक्टो.) : रविवार १० ऑक्टाेंबरला स्थानिक जेष्ठ नागरिक सेवा संघ चंद्रपूरच्या हॉल मध्ये डॉ .सुभाष सोमकुंवर (प्रोटान विभाग अध्यक्ष नागपुर)यांच्या अध्यक्षतेख़ाली प्राेटानचे जिल्हा अधिवेशन पार पडले.

उद्घाटक म्हणून डॉ. प्रमोद शंभरकर तर प्रमुख वक़्ते म्हणून नरेंद्र किन्नाके, संजय पाटील, प्रा दुष्यंत नगराळे उपस्थित होते. संपूर्ण नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजनाच्या विरोधात आणि भांडवालदारांच्या फ़ायदयाचे कसे आहे, DCPS, NPS पेंशन योजना घातक असून खाजगीकरण रोखने हा एकमेव पर्याय आहे आणि याकरीता राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ हे बंद करण्याकरीता कटिबध्द आहे. असे अध्यक्षीय भाषणात डॉ.सुभाष साेमकुंवर म्हणाले.

या वेळी नागपुर विभाग स्तरावरील झालेल्या अधिवेशना चे पुरस्कार आज देण्यात आले. त्या पुरस्कारात प्रामुख्याने राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सत्यशोधक गुणवंत पुरस्कार धनराज दुर्योधन यांना तर क्रांतिज्योति सावित्रीमाई सत्यशोधिका गुणवंत शिक्षिका पुरस्कार मीनाक्षी राऊत यांचा समावेश आहे. त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रे देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले. आगामी RMBKS राज्य अधिवेशन, प्रोटान अधिवेशन या आंदोलना बद्दल सविस्तर माहिती प्रा. कविता चंदनखेडे (उपाध्यक्ष RMBkS) यांनी सांगितली.
सदरहु कार्यक्रमाचे संचालन धनराज गेडाम (महासचिव RMBKS), प्रास्ताविक प्रा. सूचिता खोब्रागडे(कार्याध्यक्षा प्रोटान) तर आभार प्रदर्शन किसन बावने यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघमित्रा सोनटक्के ,आनंदा गावंडे, कवडू पडवेकर, डॉ. ज्योत्स्ना भागवत,कल्पना पाटील,रचना गेडाम,अभिषेक भसारकर, अशोक तुमराम,मनोहर बांदरे यांनी अथक परिश्रम घेतले .उपराेक्त अधिवेशनाला शिक्षक,प्राध्यापक, रेल्वे, कॉलरी, एस टी  महामंडळ, फारेस्ट विभागाचे कर्मचारी RMBKS प्रोटानचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.