घुग्घुस नगरीतील जडवाहनांची वाहतूक बंद करा या मागणीसाठी : आम आदमी पार्टीचे रस्ता रोको आंदोलन, एक तासा पर्यंत चालले आंदोलन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१४ ऑक्टो.) : औद्योगिक परिसर म्हणुन ओळखल्या जाणा-या घुग्घुस नगरीतील मुख्य रस्त्यावरील अवैध तथा काेळशाच्या जडवाहनांची वाहतुक बंद करण्यात यावी या मागणीसाठी आज गुरुवार दि.१४ आँक्टाेंबरला आम आदमी पार्टीच्या वतीने राजीव रतन चाैकात सकाळी ११:३० वाजता रस्ता राेखाे आंदोलन करण्यांत आले. आंदोलन कर्त्यांनी या वेळी तब्बल एक तासांपर्यंत रस्ता राेकाे आंदोलन केले. दरम्यान या बाबतीत घुग्घुस येथील आप पार्टीच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पाेलिस स्टेशनला या बाबतीत एक लेखी निवेदन या पुर्विच सादर केले हाेते. परंतु पाेलिस स्टेशनच्या अधिका-यांनी त्या निवेदनाची तातडीने दखल न घेतल्यामुळे आपच्या पदाधिका-यांना व कार्यकर्त्यांना आज घुग्घुस नगरीत रस्ता राेकाे सारखे आंदोलन पुकारावे लागले. घुग्घुस शहरांमधून दिवसांगणिक कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक झपाट्याने वाढत चाललेली आहे. ज्यामुळे शहरातील प्रदूषणात माेठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तदवतचं या मुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. दि. ४ ऑक्टोंबर पासून विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली आहे. गावातील लहान शाळेकरी मुले हाच मुख्य रस्ता ओलांडून शाळे जात असतात. याच ठिकाणी अपघात होण्याचे ही प्रमाण वाढलेले आहे. दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पोलिस स्टेशन घुग्घुस येथे जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी या करिता आम आदमी पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले होते. परंतु पाेलिसांनी आज पावेताे या निवेदनाकडे काळजीने लक्ष पुरविले नाही हे खरे वास्तव आहे.

आजच्या या रस्ता राेकाे आंदाेलनात घुग्घुस आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमित बोरकर जिल्हा सचिव भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, महानगर सचिव राजू कुडे, अभिषेक सपडी , सागर बिऱ्हाडे, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश, निखिल बारसागडे, संदीप पथाडे, रवी शंतलावार, अभिषेक तालपेल्ली, रजत जुमडे, सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे, धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर, हंसराज नगराळे, प्रशांत रामटेके, दीपक निपाने व पांडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.