Top News

रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रूग्णवाहीकेचे लोकार्पण

सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापुर, (०४ सप्टें.) : रुंझा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नविन रूग्णवाहीका मिळण्याबाबत राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकभाऊ उईके यांनी निवेदनातून शासनाकडे मागणी केली. याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या. सोबतच रूग्णवाहीकेच्या मागणीचा पाठपुरावा केला. अखेर रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत नविन रूग्णवाहीका दाखल झाली आहे. 
 
दि. ३ सप्टेंबर रोजी रुंझा प्राथमिक आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार अशोकभाऊ उईके यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकभाऊ उईके, जि.प.सदस्य निमिष मानकर, मा.सभापती तथा प.स.सदस्य पंकज तोडसाम, संरपच कु प्रांजलीताई मेश्राम, व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी व गावकरी आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post