खैरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रूग्णवाहीकेचे लोकार्पण


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (०५ सप्टें.) : खैरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नविन रूग्णवाहीका मिळण्याबाबत राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकभाऊ उईके यांनी निवेदनातून शासनाकडे मागणी केली. याबाबत विविध वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या. सोबतच रूग्णवाहीकेच्या मागणीचा पाठपुरावा केला. अखेर खैरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत नविन रूग्णवाहीका दाखल झाली आहे. 
 
दि. ०५ सप्टेंबर रोजी खैरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नविन रूग्णवाहीकेचा लोकार्पण सोहळा लोकप्रिय आमदार अशोकभाऊ उईके यांच्या हस्ते संपन्न झाला.

याप्रसंगी राळेगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार अशोकभाऊ उईके, जानूसेट जिवानी व वैद्यकीय अधिकारी तायडे साहेब, विनोद बोरतवार, महादेव ठाकरे, आकाश राठोड, बाळा मानकर, मारुती ठाकरे. संजय कोटनाके, महेंद्र नैताम, ज्ञानेश्वर नैताम, किरण शिवंनवार, मयूर गाढवे, कबीर शेख, प्रवीण गेडाम, विलास कोटनाके, अमोल अवधूतकार, पुनाजी कुमरे, सतीश ढोले आणि कर्मचारी व गावकरी आदी उपस्थित होते.