टॉप बातम्या

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती साजरी

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२० ऑगस्ट) : माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सद्भावना दिन साजरा होत आहे. तरुणांच्या उर्जेला मताधिकाराचे बळ देणारे, भारतात माहिती-तंत्रज्ञानाचा पाया रचणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव जी गांधी यांची आज जयंती यानिमित्ताने महागांव वनमाला ताई राठोड कनिष्ठ महाविद्यालय, आमनी येथे त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी सुनिल भाऊ राठोड, सरचिटणीस यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी, सुनिता ताई राठोड, सरपंच, आमनी, संतोष पाटील, गोविंद राठोड, शंकर चव्हाण, आशाताई वानखेडे, स्मिताताई जाधव, पंजाब कांबळे, सर्व ग्रा.प.सदस्य, मुख्याध्यापक, जे.डी. वानखेडे, के.एन.कवाडे, व सर्व शिक्षक उपस्थित होते.

जात-वंश-धर्म-भाषाविषयक भेदभाव न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करणे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील प्रतिज्ञा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सुनिल भाऊ राठोड यांनी उपस्थितांना दिल्या 


Previous Post Next Post