टॉप बातम्या

मारेगाव नगरपंचायत चे वार्ड नंबर ६ च्या 'त्या' मागणीकडे दुर्लक्ष: ३० जुलै दिले होते निवेदन


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२० ऑगस्ट) : मारेगाव नगरपंचायत नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असते. एक चर्चा संपत नाही तोवर दुसरी चर्चा तयार असतेच, अशीच धुसपूस वार्ड नंबर सहा मध्ये सुरु आहे. गेल्या ३० जुलै ला प्रभाग क्र.६ च्या नागरिकांनी मारेगाव नगरपंचायत ला अर्ज देऊन मागणी केली असून सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे.

शहरातील प्रभाग क्र ६ मधील पाणी फिल्टर लावलेले आहे. त्या पाणी फिल्टर च्या बाजूला पावसाळ्यात नेहमी पाणी जमा होऊन राहत असते. या मुळे जाण्या येण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने सदर रस्त्यावरील खड्यामध्ये मुरूम टाकून हा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी ३० जुलै २०२१ रोजी करण्यात आली होती, तेव्हा पासून या मागणीकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांनी माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. पाण्या पावसाचे दिवस, शिवाय खड्यामुळे जीवाला धोका, निर्माण होऊ नये म्हणून  आमची किरकोळ गोष्ट कानाडोळा न करता सदर रस्त्यावर मुरूम टाकून द्यावे अशी मागणी मनोज तुकाराम लांडे, रविकांत घोगडे, येरमे व नेहारे यांनी केली आहे.
सतत च्या पावसाने या ठिकाणी पाणी साचून रोगराई पसरण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी   नगरपंचायत ने या रस्त्यावर मुरूम टाकून संभाव्य रोगराई व येण्या जण्यासाठी निर्माण होणारी एवढीच अडचण दुरु करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
Previous Post Next Post