सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२५ ऑगस्ट) : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं कलाकुंज व्यासपीठाची सदस्या तथा या पूर्वी झालेल्या साैंदर्यस्पर्धेत अनेक पुरस्कार प्राप्त केलेली कु.कल्याणी सराेदे हिला इन्टरनॅशनल आईकाॅनिक अर्वाड्स सीजन-७ ची बेस्ट मेकअप आर्टिस्ट पुरस्कार देवून नुकतेच गाैरविण्यात आले आहे.
मुंबईच्या एका नामांकित हॉटेल मध्ये पार पडलेल्या एका भव्य कार्यक्रमात कल्याणीला हा पुरस्कार अनेकांच्या उपस्थित देण्यात आला. विदर्भातील उपराजधानी नागपूर समिपच्या कांद्री-कन्हान या गावची ती मुळ रहिवासी असुन, गत चार वर्षापासून कल्याणी "सहजं सुचलं कलाकुंजला" जुळलेली आहे.
मुंबईत स्थित आयोजित या कार्यक्रमाला अनेक नामवंत कलावंत यावेळी उपस्थित हाेते. दरम्यान, कल्याणीच्या या यशाचे कौतुक विदर्भातील अनेक कला प्रेमींकडून केले जात असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.