टॉप बातम्या

तांदूळ माफियाकडून पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी; पत्रकारांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकाना निवेदन


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
यवतमाळ, (१० ऑगस्ट) : जिल्ह्यातून होत असलेल्या रास्तभाव दुकानातील तांदळ तस्करीचे वृत्त प्रकाशित केल्याने अज्ञात व्यक्तीकडून लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक सुरेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान संबंधितावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी श्रमिक पत्रकार संघाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली. अशी माहिती श्रीकांत राऊत जिल्हाध्यक्ष श्रमिक पत्रकार संघटना यवतमाळ यांनी दिली.
Previous Post Next Post