सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी, (१३ ऑगस्ट) : आदिवासी समाज हा निसर्गपूजक समाज आहे. त्यांचे या सृष्टी वरील निसर्ग, प्राणी, वृक्ष, दगड, नदी यांचे आपल्या परंपरेनुसार पूजतात. ते नित्याने नाग देवताची पूजन करतात, आदिवासींची परंपरा अनेक वर्षापासून कायम आहे. आपली परंपरा, संस्कृती कायम ठेवत असताना वाघोबाची ही पूजा ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. अशीच परंपरा पाटणबोरी येथे पाहायला मिळते, येथील प्रधान समाज नागदेवता ची पूजा करताना दिसून आले.
महादेव महिन्यातील पहिले दैवत नागोबा यांची पाटणबोरी येथे समाजबांधव आपल्या वंश परंपरेपासून नाग देवतांचे पूजन करतात. येथील आदिवासी पिढ्यानपिढ्या हा नाग पंचमी सण आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अनमोल ठेव्याचे जतन करून ऐकतेचे संदेश देताना दिसून येते. आपल्या परंपरेनुसार नागदेवता ची पूजा करतात. पाटणबोरी येथे नागदेवता चे मंदिर आहे. याठिकाणी आपल्या रूढीनुसार नाग मूर्तीचे पूजन करून हा त्यांना अभिवादन केले जाते. नागपूजन आदिवासी समाजाचे निसर्ग सणातील महादेव महिन्यातील विशेष सण असून, आदिवासी हे निसर्ग पूजक असल्याचे आजही सिद्ध होते.