सह्याद्री न्यूज नेटवर्क |
चंद्रपूर, (१५ जुलै) : बल्लारपूर येथील कोळसा व्यापारी सुरज बहुरिया यांची वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आठ ऑगस्टला भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वर्चस्वाच्या वादातून घडलेले हे टोळीयुद्ध पुनःश्च सक्रिय झाल्याचे काल च्या घटनेने उघड झाले आहेत.
सोमवारी मुख्य बाजार पेठेतील रघुवंशी कॉम्पलेक्स परिसरात आकाश उर्फ चिंना अंदेवार या युवकांवर बुरखाधारी युवकाने अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात आकाश गंभीररित्या जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. त्यानंतर पोलीस निरीक्षक यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पाथकाने बल्लारपूर येथून दोन युवकांना रात्रीच्या सुमारास अटक केली.
अंकुश वर्मा व अमित सोनकर असे अटकेतील युवकांची नावे आहेत. विशेष म्हणजे, अटकेतील दोन्ही युवक सुरज बहुरिया टोळीचे सदस्य असल्याचे प्राथमिक माहिती आहे.