पुलावरून तरुणाने घेतली नदीत उडी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : झोला हद्दीतील वर्धा नदीच्या पुलावरून तरुणाने उडी घेतली. उडानपुलावरून उडी घेतल्याने एकच खळबळ उडाली. प्रणय संजय गोखरे (अंदाजे वय 22) रा. जैन ले-आऊट, वणी येथील असल्याचे माहिती समोर आली असून त्याचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहेत.

हा तरुण पाटाळाच्या दिशेने वर्धा नदी च्या उड्डाणपुलावरुन सदरकडे जात होता. पुलाजवळ पोचताच त्याने गाडी उड्डाणपुलावरच थांबवली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात तो पुलाच्या कठड्यावर चढला. सकाळी साडे दहा च्या सुमारास हा तरुण पुलावरून उडी मारत असताना कॅमेऱ्यात कैद झाला. 

या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच काही वेळातच पोलीस दल घटनास्थळी पोहचले, तरुणाच्या उडी घेण्यामागचे नेमके कारण मात्र,अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Previous Post Next Post