टॉप बातम्या

कोरोना महामारीच्या काळात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक कूलमेथे ह्याचा सत्कार

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
राजूरा, (२९ जुलै) : श्री शिवाजी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय राजूरा, क्रिडा विभाग, तथा पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती युवा, युवती संघटन, राजूरा च्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला.
   
कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी, सफाई कामगार ह्यांनी जीवाचि बाजी लावून कामे केली. त्यांच्या कामाला प्रोत्साहन मिळेल ह्या उद्देशाने आज सहायक पोलीस उपनिरीक्षक विनायक कूलमेथे ह्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

माजी संसदपटू वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार संजय धोटे, श्री शिवाजी कॉलेज च्या संचालक मंडळ व राजूरा शहरातील मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post