सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
चंद्रपूर, (६ जुलै) : गोंडवाना विद्यापीठाने 29 जून रोजी जारी केलेल्या निर्णयात येत्या शैक्षणिक सत्रात 2021- 22 करिता विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, आव्हान, इंद्रधनुष्य, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी संघ शुल्क व अन्य प्रकारचे शुल्क 100 टक्के रद्द करण्यात आले तसेच प्रयोगशाळा शुल्क, ग्रंथालय शुल्क यामध्ये 50 टक्के फी सवलत देण्यात आली या निर्णयाचे विद्यार्थी वर्गात स्वागत करण्यात आले परंतु परीक्षा शुल्कात मात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला परीक्षा शुल्कात विद्यापीठाने 10 टक्के कपात केली त्यामुळे विद्यार्थी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठ जसे अमरावती, नागपूर, कोल्हापूर या विद्यापीठाने अनुक्रमे 30 टक्के, 25 टक्क्यांची कपात केली आहे परंतु गोंडवाना विद्यापीठाद्वारे 10% परीक्षा शुल्क कमी करून विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. कोरोना महामारी च्या भयंकर विखळ्यात सापडलेला विद्यार्थी आर्थिक अडचणीवर कसाबसा मात करत परीक्षा शुल्क भरतो परंतु विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते. जिल्ह्यात अतिदुर्गम भागात असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षणाची गंगा पोहोचावी या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली व अतिदुर्गम भागात असणारा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत आहे शासनाने या आधीच बेरोजगारीची भर विद्यार्थ्यांवर टाकली असून विद्यार्थी, पालक वर्ग कोरोना महामारी मुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे शासनाने व गोंडवाना विद्यापीठाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षा शुल्कात 50 टक्क्याची कपात करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, बल्लारपूर तर्फे विद्यापीठ प्रशासनाविरोधात उग्रआंदोलन करण्यात येईल यास सर्वस्व विद्यापीठ प्रशासन, शासन जबाबदार राहील असे निवेदनाच्या मार्फत सिद्धांत पुणेकर यांनी म्हटले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उच्चशिक्षण मंत्री, राज्यपाल, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना स्वप्निल, सोनटक्के, प्रथम दुपारे ,सिद्धांत पुणेकर, प्रणित चालखुरे, फारुक शेख आदी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.