सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव, (ता.१५) : मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याचे चित्र आहे. नाले ओढे पाण्याचे गच्च भरून वाहू लागले आहेत. ग्रामीण भागात जनावरांना पाण्याची उन्हाळ्यात पिण्याची टंचाई होती, ती ऐका रात्रीतून पाऊस भरून निघाल्याचे मच्छिन्द्रा येथील नाला पाहून लक्षात येते. या नाल्यातून हिंडता फिरता येत होते, त्या नाल्याला आता चार-पाच फूट पाणी वाहू लागले आहे.
'वरून राजा रात्रभर बरसला आणि बळीराजा सुखवला' आहे. मुंबई सह विदर्भात पावसाची येण्याची शक्यता हवामान विभागाने दिली ती काही प्रमाणात या आठवड्यात अधून-मधून आलेल्या पावसावरून लक्षात घेता येईल. एकंदरीत काल रात्री आलेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असून शेतात टिबलेल्या कपाशीच्या पेरणीला सध्या संजीवनी मिळाल्याचे समाधान व्यक्त करून अशीच पुढे वेळोवेळी वरून राजा साथ देवोत असे, शेतमजू्रांसह जगाचा पोशिंदा म्हणतोय.