Top News

स्वतः चा वाढदिवस साजरा न करता कोरोना लसीकरणाची केली जनजागृती

सह्याद्री न्यूज  नेटवर्क | 
दारव्हा, (ता.१६) : सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असुन, नागरीकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी प्रशासनाकडुन वारवांर आवाहन करण्यात येत आहे. पंरतु असे असतांना काहीजण अजुनही कोरोना लसीकरणाचा बाउ करुन लसीकरणाबाबत भिती मनात असल्याने लसीकरण करत नसल्याचे दिसत आहे.

प्रशासनाकडुन घरोघरी जावुन जनजागृतीसोबतच लसीकरणाबाबत कुटूंबातील व्यक्तींची माहीती घेण्याचे काम सुरु असतांना सामाजिक भान ठेवत दारव्हा शहरातील अंबीका नगर येथील युवक पवन शेबे यांनी सोमवार दि. १४ जुनला स्वतः च्या वाढदिवसाचा खर्च कोरोना लसीकरण जनजागृती रथावर खर्च करुन दारव्हा तालुक्यासह शहरातुन कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली.
सामाजीक भान जपत आपणही समाजाचे देणे लागतो हा उद्दात हेतू ठेवत वाढदिवसावर होणार वायफळ खर्च सत्कारणी लागावा, या उद्देशाने कोरोना जनजागृती रथ तयार करुन ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातुन कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

व्हाटसअप,फेसबुकच्या जमान्यात युवा पिढी तासंतास सोशल मिडीयामध्ये गुरफटली असुन, ट्रेंड म्हणून मोठया प्रमाणात खर्च करुन समाजमाध्यमावर फोटो प्रसिध्द करणाऱ्या युवकांना ही मोठी चपराक आहे. युवा उद्योजक असलेले पवन शेबे यांच्या या स्तुत्य उपक्रमाची सोमवार रोजी सर्वत्र शहरात मोठी चर्चा सुरु असुन, त्यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. 
   
Previous Post Next Post