सह्याद्री न्यूज | अतुल खोपटकर
शिवाजीनगर, (ता.४) : पुण्यातील गणेश मंडळाकडून फक्त सणानिमित्त वर्गणीच गोळा केली जाते असं नाही तर मंडळातील प्रत्येक कार्यकर्ता वेळप्रसंगी सामाजिक जाणीवेचे भान ठेऊन, अडीअडचणीला खंबीरपणे उभा राहतो, याचेच उदाहरण म्हणजे शिवाजीनगर प्रभागातील हनुमान नगरातील संग्गाण्णा मित्र मंडळ.
नेहमी स्थानिक नागरिकांना मदत करणाऱ्या या मंडळाकडुन "एक हात मदतीचा" या संकल्पनेतून प्रहार दिव्यांग संगठना, शिवाजीनगर भागातील दिव्यांग-अपंग अश्या ३० नागरिकांना पत्रकारनगर भागात अन्नधान्य वाटप करण्यात आले.
प्रहार संगठनेचे कार्यकर्ते अरुण वाघमारे, बापू धुमाळ, प्रभाकर तांबे, चंद्रकांत तुपसौन्दर्य, शंकर खरात, शंकर साबळे, परशुराम यमकर, अतुल खोपटकर यांच्याबरोबर संग्गाण्णा मित्र मंडळाचे मोजकेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
योग्य नियोजन आणि कोरोना नियमांचे पालन करीत कार्यक्रम पार पडला..