वरोरा पोलिसांनी आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या, आरोपीसह ९,००,८०० रुपये चा माल जप्त


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (१४) : वरोरा शहरातील अभ्यंकर वार्ड येथे  पोलीसांनी संशयरीत्या येणारे चारचाकी वाहन क्र. MH 12 EX 7291 हे दारू भरून येत आहे अशी मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून वाहणास पकडले. ज्यामध्ये पोलिसांनी एकूण ९,००,८०० रुपये चा माल जप्त करण्यात आला.
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकातील अंमलदार रात्री गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली की, वरोरा येथे एक चारचाकी वाहन दारू भरलेले येत आहे. या माहितीच्या आधारे वाहन क्र. MH 12 EX 7291 हे संशयितरित्या येताना दिसून आल्यावर त्याचा पाठलाग करून सुयोगनगर अभ्यंकर वार्ड वरोरा येथे सदर वाहन ताब्यात घेण्यात आले. यावेळी वाहनात प्रत्येकी ९० मिली. भरलेल्या ४००.शिश्या अशा ४० पेट्या किंमत ४,००,००० रु. तर प्रत्येकी १८० मिली. भरलेल्या स्टर्लिंग रिझर्व बी -७ च्या ९६ निपा अशा दोन पेट्या  किंमत २८८०० रु. प्रत्येकी १८० मिली. भरलेल्या २४० निपा अशा ५ पेट्या किंमत ७२,००० रु. व वाहन क्र. MH  12 EX 7291 किंमत ४,००,००० रुपये असा एकूण ९,००,८०० रु. चा मालासह आरोपी स्वप्नील अंबादास चाफले (३०) रा. पिंपळगाव ता. समुद्रपूर जि. वर्धा यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्री. अरविंद साळवे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा निलेश पांडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वरोरा दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात पो.उपनी. सर्वेस बेलसरे, सफो. विलास बलकी, पो.हवा. राजेश वऱ्हाडे, दिपक दुधे, नापोशी. दिलीप सूर, नापोशी किशोर बोढे, पोशी. कपिल भांडारवार, दिनेश मेश्राम, विशाल गिमेकर, सुरज मेश्राम, महेश बोलगोडवार, प्रवीण निकोडे, मोहन निषाद या डीबी पथकांनी पार पाडली.