टॉप बातम्या

महागांव शहरात बहुजन मुक्ती पार्टिच्या वतीने महागाईच्या विरोधात धक्का मारो! अंदोलन


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
महागांव, (ता. १५) : २०१४ ला सत्तेत आलेलेल्या नरेन्द्र मोदी भाजपा सरकारने महागाई कमी करण्याऐवजी महागाईचा बकासुर निर्माण केलाआहे. गेल्या सात वर्षांपासून महागाई कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. यात पेट्रोल,डिझल आणि गॅसचा भडका उडाला आहे.
भाववाढीने सर्व सामान्य नागरिक होरपळून निघाले आहेत. एकीकडे लॉकडाऊन असल्याने नागरिकांचे दरडोई उत्पन्न घटले असून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी जिवाचे रान करीत आहे. तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला जात आहे. नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने सर्व सामान्य माणसाचे जगणे मुश्कील केले आहे. या कुंभकर्णी सरकारला जागे करण्यासाठी आज महागांव शहरात भारत मुक्ती पार्टी युवा आघाडी व भारत मुक्ती पार्टी महिला आघाडीच्या वतीने, तहसिल कचेरी वर एक दिवसीय टॅक्सी,रिक्षा,मोटर सायकलसाठी धक्का मारो आंदोलन छेडण्यात आले आहे.
Previous Post Next Post