Top News

सार्वजनिक आरोग्य विभागात पेसा अंतर्गत पद भरती करा. - किनवट नॅशनल गोंडवाना युथ फोर्सची मागणी


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (ता.२१) : कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम बनविण्याचे शासनाचे लक्ष असून आरोग्य विभागाशी निगडित असलेली सर्व प्रकारची रिक्त पदे तात्काळ भरणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे यांनी केली आहे.
सदर बाब लक्षात घेऊन येणाऱ्या पदभरती मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच जिल्हा हिवताप विभागाध्ये आरोग्य सेवक ४०% हे एक महत्वाचे पद असून,सदर पद हे ग्रामीण जिवनाशी संलग्नित असल्याने आरोग्य सेवक ४०% पदाचा पेसामध्ये समावेश २ जून २०१४ मध्ये करण्यात आला.

सदर शासनाचा निर्णय झाल्यापासून २०१६ ला आरोग्य विभाग भरती राबविण्यात आली परंतु त्या पदभरती मध्ये महाराष्ट्रातील एकूण १३ (तेरा) पेसा क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांपैकी १२ (बारा) जिल्ह्यामध्ये सदर भरती ची अमलबजावणी करण्यात आली परंतु नांदेड जिल्ह्यातील किनवट,माहूर हा पेसा क्षेत्र असूनही येथील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनात आले आहे.

त्यामुळे किनवट-माहूर तालुक्यांतील विध्यार्थीना (एस. टी) अनु.जमाती विध्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही,सदर बाबीची दखल घेवून आपल्या वतीने तात्काळ हिवताप अधिकारी नांदेड व उपसंचालक आरोग्य विभाग लातूर यांना सदर बाब लक्षात आणून द्यावे व आगामी पदभरती मध्ये रोस्टर, बिंदूनामावली नुसार आरोग्य सेवक ४०% हे पद 'पेसा' अंतर्गत पद भरती मंजूर करून घ्यावी व तमाम अनु.जमाती विध्यार्थ्यांना उपकृत करावे अशी ही नम्र विनंती निवेदनातून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय कार्यलय किनवट, यांना करण्यात आली.

यावेळी 'नॅशनल गोंडवाना युथ फोर्स' चे अध्यक्ष व सदस्य बालाजी देवराव सिडाम, संतोष पोहूरकर, संतोष गुहांडे, आशिष उर्वते, स्वप्नील मेश्राम, आशिष कुमरे, पवन मडावी, बालाजी आत्राम, सुनील जुमनाके, गजानन कुळमेथे, दिनेश गेडाम, मारोती आत्राम, शिवाजी सिडाम, सौरव वेट्टी यादी उपस्थित होते.
Previous Post Next Post