सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी, (ता.१४) : महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि उत्तम वक्ते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्मा. संस्थापक अध्यक्ष राज (साहेब) ठाकरे यांना यांच्या ५३ व्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून वणी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे कार्यकर्त्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
मा.राज (साहेब) ठाकरे यांची प्रत्येक कार्याकडे बघण्याची कलात्मक दृष्टी राजकारणात अनोखी आहे. ती अंगीकारत वणी तालुक्यातील मनसे सैनिकांनी वाढदिवसनिमित्त शहरातील परिसरात वृक्षारोपण करून ५३ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी धनजय ञिबंके, लकी सोमलकर, रोशन शिदे, अमोल मसेवार, अजय हेपट, शुभम पिंपळकर, मयुर घाटोळे, अजु शेख ईरफान शेख, व संकेत गंधारे आदी मनसे सैनिक उपस्थित होते.