Top News

बार्मडा गावकऱ्यांना खचलेल्या पूलचा होताहेत नाहक त्रास, प्रशासन लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (ता.१६) : तालुक्यातील बामर्डा या गावाला जोडणारा पूल गेल्या दोन वर्षापासुन जीर्ण होऊन खचला आहे. आज दि. १५ जून २०२१ रोजी जोरदार पाऊस पडला असून, पुलाला पूर आल्यामुळे गावाचा जनसंपर्क काही वेळासाठी तुटला. जीर्ण झालेल्या पुलाचे सध्या खोलीकरण कमी असल्याने पूर केव्हा येईल हे सांगताच येत नाही. सध्या शेतातील कामाची लगबग,पेरणीचा हंगाम सुरु झाल्याने गावातील शेतकऱ्यांना या मार्गावरून जाण्या येण्यासाठी खूप अडचणी होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना हातचे काम बुडवून त्यांना पुलात अडकलेली पुराण काढण्यासाठी आपला वेळ द्यावा लागत आहे.
याबाबत अनेकदा या भागातील लोकप्रतिनिधी प्रशासनाला ह्या रस्त्याची बतावणी करून यापूर्वी बऱ्याच अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, पण त्यांची निराशाच झाली. आज त्यांनी चक्क राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची पायरी चढली असून, आयोगाला या परिस्थिती ची नोटीस देखील पाठविली असून याबाबत निवेदन दिली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष देत नाही. असा त्यांनी आरोप केला असून, प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचं त्यांनी सांगितले. जर बामर्डा गावाच्या पुलाचा प्रश्न सुटला नाही तर गावकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करू असे सामाजिक कार्यकर्ते धनंजय आसुटकर यांनी सांगितले.

Previous Post Next Post