टॉप बातम्या

मारोती तुराणकर यांची भाजपा कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुका शाखेच्या वतीने मारोती तुळशिराम तुराणकर यांची भाजपा कामगार आघाडीच्या मारेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपा मारेगाव तालुकाध्यक्ष मा. अविनाश देविदास लांबट यांच्या स्वाक्षरीने दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदान करण्यात आले.

भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात मारोती तुळशिराम तुराणकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, वणी नगराध्यक्षा सौ विद्या आत्राम, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पवन एकरे,प्रदीप जेजरकर, यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

पक्ष संघटनेप्रती निष्ठा, सामाजिक कार्यातील सहभाग आणि कार्यक्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात पक्षाच्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कामगार आघाडीच्या माध्यमातून कामगार वर्गाशी संवाद वाढवून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच पक्ष संघटना तळागाळात मजबूत करण्याची जबाबदारी आता तुराणकर यांच्यावर राहणार आहे.

अविनाश लांबट यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात झालेल्या या नियुक्तीमुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मारोती तुराणकर यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();