सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील देवाळा गावात मोठ्या भावावर सख्ख्या लहान भावाने फावड्याने हल्ला केल्याची गंभीर घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, सुनिल बावणे याने त्याचा मोठा भाऊ अनिल बावणे (वय 35) याच्यावर राहत्या घरात अचानक फावड्याने प्रहार केले. हल्ल्यात अनिल बावणे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी अवस्थेतील अनिल बावणे यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले तेथून पुन्हा नागपूर येथील मेडिकल कॉलेज मध्ये दाखल करण्यात आल्याचे समजते.
या प्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून सुनिल बावणे (वय31) याच्याविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.