टॉप बातम्या

आज मारेगावात “गुणवंत युवकांचा गुणगौरव सोहळा”


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत युवकांच्या सत्कारासाठी जनहित कल्याण संघटना व तालुका गुणगौरव सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज, मंगळवार दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता नगर पंचायत प्रांगणात भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून सुदर्शन शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र ठाकरे, रंगनाथ सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काले, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, संचालक अरुणा खंडाळकर, पणन महासंघ मुंबईचे संचालक संजय खाडे, झरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू कासावार, काँग्रेस नेते प्रवीण काकडे, तालुका कमिटी अध्यक्ष वसंत आसुटकर, तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव वनखंडे, पोलीस निरीक्षक शाम वानखेडे, वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर, तहसील कृषी अधिकारी दिपाली खवले तसेच प्राचार्य अविनाश घरडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षण, क्रीडा, सामाजिक व इतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवकांचा गौरव करण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();