वादाच्या भोवऱ्यात 'तो' अडकलेला दवाखाना तूर्तास बंद!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
 
मारेगावबोटोणी येथील जनकल्याण समिती यवतमाळ द्वारा उघडण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ग्रामीण रुग्णालय अल्पकाळात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने तूर्तास बंद करण्यात आले. तशा आशयाची जाहीर सूचना अध्यक्ष यांचेकडून लावण्यात आले आहे. 

येथील बहुचर्चित ग्रामीण रुग्णालय पुरेशा कागदपत्राची पूर्तता न करता उघडण्यात आले होते.कर्मचारी भरती प्रक्रियाही मोठा गाजावाजा करून करण्यात येवून हा दवाखाना थाटण्यात आला.

अनधिकृत असलेल्या दवाखाण्याचा भंडाफोड करून सोशल मिडियावर वृत्त मालिका प्रकाशित करण्यात आली. प्रशासनाने तत्काळ दखल घेत कारवाई सुरु केली. या कारवाईत अनेक बाबींची पूर्तता नसल्याचे निष्पन्न झाले. 

परिणामी, गत 22 ऑगस्ट रोजी प्रशासनाने 'बंद' चा आदेश निर्गमित केला.पेसा अंतर्गत असलेल्या बोटोणी गावात व परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याचा खेळ मांडणाऱ्या संस्थेला हा बहुचर्चित दवाखाना कुलूपबंद केला. दरम्यान, येथील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व बोगस कागदीघोडे नाचवून दवाखाना थाटणाऱ्या अध्यक्षावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी बोटोणीकरांची मागणी आहे.
Previous Post Next Post