सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आज १२ ऑगस्ट २०२५ रोज मंगळवारला वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचा मारेगांव तालुका कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद दौरा असून पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी होणाचे आवाहन वंचित बहुजन आघाडी मारेगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहेत.
आगामी काळात लवकरच स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता त्यावर विस्तृत चर्चा करणे व पक्षाची नव्याने तालुका कार्यकारीणी निर्माण करणे अनिवार्य आहे. याबरोबरच वर्षावासा निमित्य विहार भेटी व गाव भेटी देखील संवाद दौऱ्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून म्हटलं गेलं आहे.
त्या अनुषंगाने पक्षश्रेष्ठींच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष डॉ.निरज वाघमारे आणि जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी यांचा आज मंगळवारला मारेगाव तालुक्यात कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे.
नियोजित दौऱ्याची सुरुवात:
१) सकाळी ७ वाजता
मारेगांव येथील धम्मराजीका बुद्ध विहाराला भेट. बुद्ध वंदनेनंतर धम्म अनुयायांशी चर्चा. त्यानंतर, परमपूज्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन. अभिवादनानंतर कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा संपन्न होईल. व त्यानंतर जयघोषात कार्यकर्त्यांसह मारेगांव येथीलच मार्डी चौकातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिवीर बिरसा मुंडा आणि नगरपंचायत भवनासमोरील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे पूजन आणि अभिवादन. त्यानंतर कार्यकर्त्यांसह मारेगांव येथून आकापूरकडे प्रस्थान.
२) सकाळी ९ वाजता
• आकापूर येथील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी थेट संवाद.
३) सकाळी १०:३० वाजता
• बांमर्डा येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट.
४) दुपारी ११ वाजता
• चिंचमंडळ येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद.
५) दुपारी १२ वाजता
• मार्डी येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट व संवाद.
६) दुपारी १ वाजता
• देवाळा येथील बुद्ध विहारास भेट व धम्म बांधवांशी संवाद
७) दुपारी २ वाजता
• सिंदी येथील धम्म बांधवांसह कार्यकर्त्यांची भेट, संवाद व अल्पोपहारानंतर मारेगांव कडे प्रस्थान.
८) दुपारी ३:३० वाजता
• मारेगांव येथील घोन्सा रोड वरील श्री. साई मंदिरात जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांचा मंदिर कमिटी कडून सत्कार व कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा.
९) दुपारी ४ वाजता
• मारेगांव येथीलचं परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रॅलीचे माध्यमातून, बळीराजा शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसह स्थानिक मागण्यांना घेऊन सरकारला निवेदनाचे माध्यमातून जाब विचारण्यासाठी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांसह तहसीलदार यांना निवेदन व त्यानंतर बोटोणी कडे प्रस्थान.
१०) सायंकाळी ६ वाजता
• बोटोणी येथील बुद्ध विहारात भेट व धम्म बांधवा सोबत चर्चा व सराटी कडे प्रस्थान.
११) सायंकाळी ७ वाजता
• सराटी येथील बुद्ध विहारात भेट. पदाधिकारी व धम्म बांधवांसोबत संवाद.
१२) सायंकाळी ८ वाजता
• नवरगांव येथील बुद्ध विहारास भेट. धम्म बांधवांसोबत थेट संवाद.
१३) सायंकाळी ९ वाजता
• सगणापूर येथील बुद्ध विहारास भेट. धम्म बांधवांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत थेट संवाद.
१४) सायंकाळी १० वाजता
• सगणापूर येथे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद दौऱ्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ता व धम्म बांधवांच्या धम्म भोजना नंतर पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद दौऱ्याचा समारोप.