टॉप बातम्या

वणीत जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य मोटारसायकल रॅली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : 'जागतिक आदिवासी गौरव दिन' हा दिवस जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आणि संस्कृतीसाठी साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून घोषित केला आहे, 

या गौरव दिनानिमित्त दि.9 ऑगस्ट ला शहरामध्ये भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे.

शनिवारला भीमालपेन देवस्थान, वणी येथुन दुपारी 4 वाजता आदिवासी समाज बांधव यांच्या नेतृत्वाखाली मोटारसायकल रॅली काढून वणी शहरामध्ये फिरुन भीमालपेन देवस्थान येथे समारोप होईल.

तरी समस्त आदिवासी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समाज बांधवांनी केले आहे.
Previous Post Next Post