लाडक्या बहिणींचे मुख्याधिकारी यांना साकडे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी शहरात प्रमुख चौकाचौकात महीला प्रसाधन गृहांची निर्मिती करण्याची मागणी नारिशक्ती कडून करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी, साई मंदिर चौक वणी, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक अशा प्रमुख चौकात महीला प्रसाधन गृहांची निर्मिती करण्यात यावी अशा आशयचे निवेदन आज देण्यात आले.

शहरात जवळपास 80 हजार लोकसंख्या असेलेली तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असून शहरी व ग्रामीण भागातील महीला प्रतिदिन बाजार हाटासाठी खरेदी-विकी साठी शहरात येत असतात.सोबतच वणीत मोठ्या स्वरूपात धार्मिक, व सण-सुदी मध्ये कार्यक्रमांची रेलचेल सुद्धा असतात. शहरातील मुख्य चौकात वर्दीळीच्या ठिकाणी बजारपेठ असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील महीलांना "महीला प्रसाधनगृह" नसल्यामुळे महिला वर्गाची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. ह्याकडे नगरपरिषद दुर्लक्ष करीत आहेत.अलिकडे शासन महीलांना लाडक्या बहिणींचा मान देत आहे पण महीलांच्या प्राथमिक सुख सोयी व सुविधेकडे दुर्लक्ष करीत आहेत.

मागील 11 वर्षात विकासाचा महापूर वणी शहरात आला विकास कामे केली, मग महिला प्रसाधन गृहासाठी आपल्या कडे निधी नाही का? याबाबत शंका आहेत,असा सवाल उवस्थित होत आहेत.नगर परिषदेकडे वारंवार निवेदन तक्रारी देऊनही सुद्धा महिलांच्या प्राथमिक गरजेकडे प्रशासनाचे उदासीन धोरण दिसत आहे.

आपण हा विषय गंभीर्याने घेऊन महिला साठी महिला प्रसाधन गृहाची निर्मिती करण्यात यावी, अन्यथा पर्यायी आम्हाला नगरपरिषद प्रशासन विरोधात नारी शक्तीला सोबत घेऊन आंदोलन करावे लागेल यांची नोंद घ्यावी..यावेळी वृषालीताई खानझोडे माजी उपसभापती पं. स. वणी यांच्यासोबत निवेदन देते वेळी पूजा पानघाटे, शिला मेश्राम, पुष्पाताई आत्राम,ईशा ठाकुरवार,मंदा सोनारखन, सुवर्णा चतुर, उज्वला कोवे, ललिता खैरे, कांचन सिडाम, पौर्णिमा तूराणकर, महिला उपस्थित होत्या.


"शहरी व ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने बाजारात खरेदी करण्याकरिता येताट त्यामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात त्याच्या स्वरूपात वाढ होतात पण याच महिलासाठी वणी परिसरात कुठेच महिला प्रसाधनगृह नसावे ही शोकांतिका आहे विकासाच्या नावाने आरोळ्या ठोकणाऱ्या सर्व जनप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी महिलांच्या प्राथमिक सुख सुविधीकडे दुर्लक्ष करावे यापैकी दुसरे दुर्दैव काय होऊ शकते,म्हणून या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ मुख्याधिकारी यांनी चौका- चौकात जागेची पाहणी करून महिला प्रसाधनगृहाची निर्मिती करावी, अन्यथा येत्या महिन्याभरात वणी व ग्रामीण महिला शक्ती रस्त्यावर उतरून आंदोलन करील." -सौं वृषालीताई प्रवीण खानझोडे, माजी उपसभापती पं स वणी 

Post a Comment

Previous Post Next Post