सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : जिल्हा परीषद आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रिय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहीकाचे चालक गेल्या १५ ते १८ वर्षापासुन ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा देत आहेत.
वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने वाहनचालकांच्या सेवा थेट कंत्राट पदधतीने बाहय संस्थेकडे दिल्यामुळे अनेक वर्षे सेवा दिलेल्या चालकांचे भवितव्य अधांतरीत झालेले आहेत. या पार्श्वभूमिवर वाहन चालक संघटनेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद व नागपुर खंडपिठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने समान काम समान वेतन देण्याचे आदेश दिले होते.
तसेच रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या चालकांना अप्पर कामगार आयुक्तांनी निश्चित केलेले मानधन देण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र, तरीसुदधा त्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार समान काम समान वेतन लागू करण्यात आलेले नाही. त्याची परस्पर चौकशी करुन वाहनचालकांना न्याय मिळवुन दयावा अशी मागणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब चंद्रपूर यांच्याकडे उमेश गोलेपल्लीवार शिवसेना तालुकाप्रमुख सावली यांनी केली आहे.