वणी : शहरात प्रतिबंधित असलेला तंबाखू, खर्रा चवीने चाखला जातो. आजही तलबगारांना खर्याविना राहावत नाही. ह्यात काही नवल जरी नसल तरी मात्र,वणी शहरात एम डी ड्रग्ज (मेफेड्रोन) मिळतोय, याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून ही वणीसाठी धोक्याची घंटा असल्याची समजली जात आहे.
शहरातील जत्रा रोड परिसरातून शुक्रवारी एका युवकांकडून एम डी ड्रग्ज मादक पदार्थ जप्त करण्यात आला आहे. क्षितिज अशोक इंगळे (वय 23) रा. रंगनाथ नगर, वणी असे ड्रग्ज बाळगणाऱ्या युवकाचं नाव आहे.त्याच्याकडून मेफेड्रोन 2 ग्राम 550 मिली पावडर मिळून आला. ज्याची किंमत 11 हजार 400 रुपये अशी असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तसेच त्याच्या ताब्यातील एक मोटरसायकल, एक आयफोन, व ड्रग्ज असा 86 हजार 400 रुपयचा मुद्देमाल जप्त केला.
सदर आरोपी हा जत्रा रोड परिसरात ड्रग्ज विक्रीकरीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली, त्यआधारे पोलीस त्या ठिकाणी गेले, त्याचा विचारपूस केली. त्याने अगोदर टाळाटाळ केली नंतर पंचांसमक्ष झडती घेतली असता आपोआप बोलका झाला आणि त्याने सर्व कबूल केले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ, गोपाल उंबरकर, पो.नि. पो.स्टे. वणी, सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, स्था.गु.शा. यवतमाळ पोउपनि धनंजय रत्नपारखी पो.स्टे. वणी पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार सुनिल खंडागडे, सुधीर पांडे, उल्हास कुरकुटे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सलमान शेख, नरेश राऊत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व निलेश आडे, पो.स्टे. वणी यांनी संयुक्त यशस्वीरित्या पार पाडली आहे.