टॉप बातम्या

शुक्रवारी संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील धडाडीचे नेते, समाजकारणी, कामगार नेते संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी शेतकरी मंदिर येथील वसंत जिनिंग हॉलमध्ये महिलांसाठी उद्योजक्ता प्रक्षिक्षण शिबिर व भव्य रक्तदान शिबिर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक संजय खाडे फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
शुक्रवारी दिनांक 23 मे रोजी स. 11 वा. महिलांसाठी उद्योजक्ता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिरात बचत गटाच्या महिलांना तसेच गृहउद्योग करणा-या महिलांना उद्योग, कर्जवाटप, रोजगारांच्या विविध संधी याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ पांढरकवडा येथील गणेश आत्राम हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरानंतर भव्य रक्तदान शिबिराला सुरुवात होणार आहे. या सर्व उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संजय खाडे फाउंडेशन द्वारा करण्यात आले आहे.


Previous Post Next Post