सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील आर.टी.आय क्लब शाखा वणी च्या वतीने दिनांक १२/०२/२०२५ रोजी मा.उपविभागीय अधिकारी साहेब वणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले.
सदर तहसील कार्यालय परिसरात असलेले सेतु सुविधा केंद्र गेल्या दोन महीन्यापासुन बंद आहे. अगोदर या सेतुकेंद्र मध्ये नागरीक सेवा घेत होते. सदर सेतुची सुविधा ही चांगली व प्रामाणिक होती. यामध्ये अनेक प्रकारचे कागदपत्र त्यांना या सेतु सुविधा केंद्रातुन मिळत होते. परंतु गेल्या दोन महिन्या-पासून सदर सेतु सुविधा केंद्र बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला शासकीय कागदपत्रे, घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आल्या पावलीच परत जावे लागत आहे. परिणामी त्यांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
तहसिल परीसरातील असलेले सेतु सुविधा केंद्र यावर जनतेचा विश्वास असल्यामुळे नागरिक इतर कुठेही न जाता शासकीय कार्यालयातच कागदपत्रे काढण्याकरता येत असतात. परंतु कागदपत्रे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीना गेल्या दोन महिन्यापासुन सेतु सुविधा केंद्र बंद अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. जनतेच्या समस्या लक्ष्यात घेता वणी तहसिल कार्यालयातील सेतु सुविधा केंद्र पूर्ववत सुरू करून जनतेला सेवा प्रदान करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन आरटीआय क्लब वणीचे वतीने देण्यात आले असून यावेळेळी दादाजी पोटे जिल्हा संघटक, पी. के. टोंगे (सल्लागार,) राजेंद्र अरके (अध्यक्ष), जवाहर अरोरा (उपाध्यक्ष), प्रशांत जुमनाके (सचिव), सामाजिक कार्यकर्ते गित घोष, शेख जलील शेख फरीद, हनुमान पोटवडे, विनोद खंडरे, हे सुद्धा उपस्थित होते.